कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंटने जगभरात हाहाकार माजवला आहे. याची भीषणता आता ब्रिटन आणि अमेरिकेत सर्वाधिक पाहायला मिळतेय. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन रुग्णांनी सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्याचवेळी अमेरिकेतही रुग्णसंख्या एका दिवसाच दुप्पटीने वाढतेय. ब्रिटनमध्ये गुरुवारी ८८ हजार ३७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल १२ महिन्यांनंतर इतकी प्रकरणे समोर आली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ८ जानेवारी रोजी ६८०५३ प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. मागील २८ दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये १६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
आतापर्यंत कुठे, किती ओमिक्रॉनबाधित आढळले होते?
मुंबई – १३ रुग्ण
पिंपरी चिंचवड -१० रुग्ण
पुणे मनपा -२ रुग्ण
कल्याण डोंबिवली – १ रुग्ण
नागपूर -१ रुग्ण
लातूर -१ रुग्ण
वसई विरार – १ रुग्ण
उस्मानाबाद – २ रुग्ण
बुलढाणा- १ रुग्ण
कोणत्या राज्यात किती ओमिक्रॉनबाधित रुग्ण?
राजस्थान- १७
दिल्ली- १०
केरल- ५
गुजरात- ५
कर्नाटक- ३
तेलंगाना- २
आंध्र प्रदेश- १
तमिलनाडू- १
चंडीगढ़- १
पश्चिम बंगाल- १
लसीकरणाला प्रोत्साहन दिले पाहिजे
कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या पाहता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लोकांना इशारा दिला की, लस मिळवण्यासोबतच आपल्याला कोरोनापासून बचावाचे सर्व नियम पाळले पाहिजेत. दुसरीकडे, इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) ख्रिस व्हिट्टी म्हणाले की, लोकांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
याबद्दल तुमचे मत कंमेंट मध्ये कळवा आणि मत मांडा.